Wednesday, 9 May 2012

Mango Festival

रात्री ११ ते सकाळी ९ असा अंग मोडून टाकणारा मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करून गाडी जेव्हा नाटे गावातल्या गणेश रानडे यांच्या अग्रो फार्मला पोचली तेव्हा कधी एकदा उतरतो आहे असे झाले होते. पण स्वागताला उभे असलेले छोटेसे टुमदार घर, शेणाने सारवलेली स्वच्छ जमीन, सर्वदूर पसरलेली नजरेत न मावणारी हिरवाई, मोकळ आकाश आणि अवीट गोडीच्या चवीचे पाणी प्यायलो मात्र मनावरचा थकवा पळून गेला खास...आणि खरया अर्थाने सुरु झाली ती मनावरची मरगळ झटकून टाकणारी छान सहल!!!!!!!
सौजन्य अर्थात Mumbai Travellers चे . शिवनेरी ट्रेकला जुईला नेता न आल्याची रुखरुख होतीच त्यामुळे रत्नागिरीचा  हा  Mango  Festival सगळ्यांनीच बघायचा अस आधीपासूनच ठरवलं होत.... खेळीमेळीच्या  वातावरणात सगळ्यांची ओळख झाली आणि आणि गणेश रानडे यांच्या आमराईत एक छानशी चक्कर. मारली .

जवळ जवळ ३० एकरमधील ती घनदाट  आमराई  डोळ्यात मावतच नव्हती. आमराईत जाणारा तो रस्ता , भरभक्कम वाढलेले ते वृक्ष, आंब्याची कलम , वातावरणात भरून राहिलेली निरव पण प्रसन्न शांतता आणि त्या शांततेला भेदून जाणारी एखाद्या पक्षाची साद एखाद चित्रच जणू सजीव झाल्यासारखं वाटत होत..
 वाटल एखाद पुस्तक घ्याव आणि खुशाल इथल्या एखाद्या डेरेदार झाडाच्या सावलीत बसून वाचत पडाव. भरदुपारी जेव्हा उन्हाच्या झळा मारत असतील तेव्हा इथल्या झाडाला  बांधलेल्या झोपाळ्यात  बसून आराम करणं म्हणजे स्वर्गसुखच!!!!
अशा वातावरणात भूक न लागते तरच नवल . अशा वेळीस भाजणीच थालीपीठ,पोळी,माठाची भाजी,आमरस,सोलकढी,फणसाची भाजी,मिसळ पाव या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांनी तोंडाला पाणी न सुटते तरच नवल. पिझ्झा, नुडल्स ,रोटी पनीरच्या भाज्यांचे आक्रमण नाही . आंब्यासकट भाज्या,तांदूळ सार काही इथल्याच मातीत रुजलेल आणि आग्रहाने खाऊ घालणार इथल अगत्य बघून दोन घास जरा जास्तच जातात पोटात....
डोंगरावरील मचाण हि तर निव्वळ सुंदर कल्पना. ३६० अंशाचा panorama देणार हे  मचाण . त्या मचाणावरून एकाच वेळी एकीकडे सूर्यास्त आणि एकीकडे चन्द्रोदयाचा जो काही आनंद घेता आला तो निव्वळ अप्रतिम .शब्दच अपुरे पडतील. हा अनुभव घेण्यासाठी तरी एकदा इथे परत यावच..

Mumbai  Travellers च्या टीमने छान गेम्स आयोजित केले होते. खूप धमाल आली. हात मागे बांधून तोंडाने खायची mango byte , treasure hunt  , angels vs demons , अंताक्षरी, musical chair एकाहून एक सरस साऱ्यांनाच समाविष्ट करून घेतिल असे निरनिराळे खेळ... इथे TV ठेवलेला नाही पण त्याची कधी गरजच पडली नाही. टीमबरोबर केलेली मजा मस्ती आणि झालेला संवाद लाख मोलाचा.

swimming pool ,अत्याधुनिक सुविधांची रेलचेल असलेली, शहरी ऐशोआराम देणारी  अनेक मोठी हॉटेल असतात पण कोकणी भाषेची,खाण्याची आणि कोकणी मातीची गोडी जपणारे   आणि इतरांना त्याचा गोडवा तितक्याच अगत्याने देणारे,एकांत आहे पण एकटेपणा नाही असा निवांतपणा देणारे  नाटे गावाचे हे फार्म नक्कीच बघायला हवे. इथल्या हवेत डोलणारी छोटी कलम  आणि त्याच वेळीस पलीकडच्या बाजूला असलेले मोठाले आम्रवृक्ष बघितले कि  रानडे कुटुंबाचे परिश्रम,त्याची जिद्द  जाणवते. आपल्या मातीशी इमान राखून  या मातीत स्वर्ग फुलवण्याच्या त्यांच्या या प्रयोगाला  आमचा सलाम !!!!!

आणि इतकी वेगळी सहल आयोजित केल्याबद्दल , सहलीमध्ये शिस्त आणि धमाल याचा योग्य समन्वय राखत प्रवास करणाऱ्याना एक अनोखा अनुभव दिल्याबदल Mumbai Travellersche   पुन्हा एकदा आभार. लोकांना काहीतरी वेगळ देण्याची आणि त्याहीपेक्षा फेसबुकच्या परिघात राहूनहि नुसतेच नेटकरी   न होता माणसाचं एक वेगळच नेट विणण्याची या चमूची (Mumbai Travellerschi ) प्रामाणिक धडपड भावली..

परत जावेसे वाटतच नव्हते पण बरोबर कोकणाचा खाऊ आणि रम्य आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .. 

9 Comments:

At 9 May 2012 at 04:53 , Blogger Gajanan said...

Excellent blog dear :)

 
At 9 May 2012 at 05:17 , Blogger vishal said...

Khup chan :).. me miss kela :(

 
At 9 May 2012 at 06:27 , Blogger Pradeep Vibhuti said...

I would like to do that!!! when I am back though.Very Nice!!

 
At 9 May 2012 at 06:37 , Blogger Unknown said...

Amazing article mam,,,in fact it should be published in some newspaper :-)...all the best from MUMBAI TRAVELLERS

 
At 9 May 2012 at 07:35 , Blogger Shailesh said...

Very nice... jage avhdhach sahaleeche varnan surekh aahe... sahaleet tumchya sobat aslya sarkhe vatle..

 
At 9 May 2012 at 09:29 , Blogger Sandeep Meher said...

Sundar post!

 
At 10 May 2012 at 01:31 , Blogger Unknown said...

This comment has been removed by the author.

 
At 10 May 2012 at 11:28 , Blogger Pravin Ladkat said...

खरच खूपच छान वर्णन केला आहे, पुढच्या वेळेस मी नक्की जाणार !!

 
At 10 May 2012 at 22:26 , Blogger subodh said...

Khup chan..! vachun trip miss keli asa vatata ahe..

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home