Thursday 16 March 2023

 Quest for a glorious career...



Part 3: Find out your kid’s niche





After completing 10th standard exam, many students start their quest to find answer


to the single question which would define their life... “what to do after 10th ?!!” , just


like Rahul in our previous blog. When they approach this problem by contacting


others they are guided based on limited understanding, biased views and unscientific


reasoning which either heads them a disaster or confuses them further.



In contrast, if a student answers to few important questions like, What I love do


learn?” , “What I am good at?”, “what is beneficial to me in longer run ?” , can


make education and career an enjoyable journey for students as well as parents.


Career aptitude test provide a systematic approach based on psychological analysis as


well as past data collated from thousands of students and analysed over a number for


years.


Orientation : What I love to learn?


Orientation or interest differ from student to student. Some of them love to do artistic


activities, some of them have interest in gaining knowledge. Some of them develope


good practical approach towards life.


Orientations may change from time to time.



Abilities : What I am good at?


Now apart from what I love to do, there are some innate abilities , activities which I


am rally good at. For example one can do Numerical calculations very well , others


will have good hold over any subject.


There are various centres which conduct aptitude tests including few online tests


which can generate report free of cost. There is no harm in giving free tests at the


same it also puts you at the risk of generalised guidance.


IPH Institute ,Thane and Jnana Prabodhini Sanstha Pune are few such organisation


which conduct these tests and have good success rate. They are working in this field


for more than a decade now.



Once the students know their orientation and abilities based on aptitude test. Next


important question remains, that is what is beneficial to me in longer run ? And


subsequently next thing which most of the students like to know “Which college


/course can help me to progress in this direction?”



Once abilities and orientation is validated with aptitude test, career counsellors  can


suggest career options / education stream which can help them in longer run. Career


counsellor can also suggest the areas student need to improve and possible ways to


improve those as well.


Approach suggested in today’s blog makes decision making a systematic and less


risky process. However it is not easy and quick . It will take time and considering


criticality of decision, it has to!


Parents / elders play an important role at this point of time. Parents once aware of


child's capabilities and orientation need to help in deciding career path taking into


account their financial capability. They are the torch bearers and their active


participation in this crucial decision can guide the student towards bright future.








We at Aashay, recoginize significance of this major milestone in student’s life and


offer services like conducting career aptitude tests and career counselling based on


the report which can not only uncover student’s orientation and abilities but also help


them in career selection for a bright and happy future.


 Feel free to connect us anytime ...



Aashay – guidance for meaningful life.

Tuesday 14 March 2023

Quest for a glorious career...

                                                             Thinking Smiley Face 3D Generated Emoji confusion stock pictures, royalty-free photos & images 
  Part 2: Kya kare kya na kare..

 As we saw in our previous blog, after completing his 10th standard exam, Rahul started his quest to find answer to the single question which would define his life... “what to do after 10th ?!!”

 Despite knowing modus operandi of many, Rahul was extremely confused as he realized most of them were taking most important decision of their life in most unscientific way. I am sure you all will also find many misguided souls around who take such critical decision based on beliefs prevalent in our society. I have tried to list a few most popular ones, though I am sure the list is much longer:

                    

Doctor ka beta doctor: This belief is partly result of the  traditional social set-up in our country from pre-historic times. Though society is shading off caste  based mindset, still there is   a deep rooted faith that offsprings naturally genetically inherit skills passed to them by their parents as legacy. This makes people believe that it is safe for students to follow the footsteps of their parents. 

This belief is further strengthen by the parents themselves. They usually lack knowledge of available career paths and related opportunities in fields other than their own domain. And to “safeguard” future of their children they push them to take up a “known” path without validating kids’ inclinations.

Do you know the fact that  Sachin Tendulkar’s dad was not a cricketer, but a well-known marathi writer and poet!

Intelligent students = science students: This is yet popular   assumption. Many parents feel that if their child will be recognized as a bright student only if he or she is opting for a professional course in science stream. In fact, I have seen many parents simply pushing their kids in science studies despite they pass with bare minimum marks in related subjects in their entire school time. It is unfair to equate inteligence to science as a student may be extremely good in many other subjects and can have bright career there too!

Nahi toh baad mein pachhataoge: Many parents make the result of 10th exam as well as stream selection after after 10th exam, a “Life and death” decision. I am sure this decision is important, but it is just the first step of a long journey ahead and it is always possible to do a course correction.

Computer engineer bano, warana koi career nahi hei: This is the latest and most impactful myth told to students in last twenty plus years. I agree that in 21st century the opportunities in computer science have increased exponentially and probability to get jobs with good “salaries” is much higher. However that does not mean that other career options are absolute zero.

The way society needs computer engineers, is also needs other skills and domain knowledge to run the businesses which will in turn use computers.

As one can see decisions taken based on these beliefs may not necessarily lead to a successful career for the student. Alternatively, even if they get into a “fat salary job”, they may not enjoy their life when they work in a career they detest the most. 

 
 

If a student answers to few important questions like, What I love do learn?” , “What I am good at?”, “what is beneficial to me in longer run ?” , can make education and career an enjoyable journey for students as well as parents. Do you want to know the simple yet scientific way to find answers to these questions? Do read my next blog.


.. TO BE CONTINUED

Sunday 12 March 2023

Quest for a glorious career...

Part 1:Mera beta toh “Engineer” banega..

                         

As Rahul came back after giving his last paper of 10th exam, he was super happy. He was looking forward for long vacations and cool college-life after that, where there was no school-uniform and strictness...

 On his way back, he met Arora aunty who was the next door neighbor. With a broad smile she enquired him about exam and wished him happy holidays. But the next question she asked , made Rahul lose all the joy and got him into a deep thought ...

The question was “Aage ka kya socha hei? .. alias “what do you plan to do after 10th ?!!”

BTW , Toh beta , ab aage kya plan hai ?" is the daunting question every other person asks as soon as the student finish  boards .  A 10th standard student becomes almost the center of attraction of the neighbourhood , every person wanting to know what his or her future would be.Many  of the times the student do not want to hear but such questions as they themselves are  not having any clarity in this regard.

After studying hard for the entire year and preparing for over hyped board examination Rahul was  not in a frame of mind to  think  about all these things.At the same time , he was well aware of the fact that many of his friends had already confirmed their admission in various  coaching Institutes.

 Suddenly he had many questions clouding his mind with a fear of uncertain future ahead . All subjects which  were part of single school syllabus, split themselves under the banner of Science, commerce and arts and started fighting. In fact he was not even sure if most of these subjects would have any actual relation at all with these branches or his career !!!

As he was not able to find any answer for this question on his own, he decided to take guidance from senior students around.

At first he approached his own elder brother to know about rationale his career choice. He found his answer very amusing and funny. His elder bother was studying pharmacy though he hated it most, just because one of their uncle was able to settle in USA after completing his initial degree in pharmacy and post-graduation in USA.

Being disillusioned by his brother’s answer, he decides to take a view from his best friend Ameya. There he realized that just like “Farhan Qureshi” in 3 idiots, fate of his closest friend was sealed by his parents when he was just born. He was destined to be a doctor “as per his parents’ wish” even when he himself feared going to hospital.

Rahul, not being convinced by this, decided to talk to Nishant, the smart and most intelligent student in his housing society. But realized he also had decided to prepare for IIT entrance exams, just because his elder cousin was studying in IIT.

  Rahul did not find any of these reasons compelling to decide his future. Even after talking to many Rahul was not still convinced in fact even further confused... the question that comes to his mind was “Kya kare kya na kare.”

... TO BE CONTINUED














Labels: , , ,

Tuesday 17 December 2019

ऋणानुबंधाच्या जिथून जुळल्या गाठी

शाळा एक अनमोल संस्कार, मनावर कोरलेला एक सुंदर सुविचार
शाळा म्हणजे प्रगतीची दोरी , शाळा म्हणजे आयुष्यभराची शिदोरी
शाळा म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत ,शाळा म्हणजे सतत तेवणारी एक ज्योत

शाळा म्हणजे नव्या  वह्यांचा वास आणि बिनधास्त खेळायला देणारा  पीटीचा तास
शाळा म्हणजे शिक्षकांची  भीती आणि निकालाविषयी असलेली धास्ती

शाळा म्हणजे मधल्यासुट्टीतील अंगतपंगत  आणि स्नेहसंमेलनाची  लगबग
शाळा म्हणजे वहीमध्ये  जपून ठेवलेले  पिंपळपान आणि  राष्ट्रगीताच्या वेळीस ताठ होणारी मान.

आठवणीतली हि शाळा खरतर कधीच  संपत नसते ती मनामनातून उरत असते....

इथला  फळा ,रंग उडालेल्या भिंती,टेबल आणि लाकडी खुर्च्या ,रंगीबेरंगी खडू ,प्रत्येक तासाला जिच्या आवाजाची अत्यंत आतुरतेने वाट पाहायची ती शाळेची घंटा सारेच या आठवणींचे साक्षीदार असतात.

खरं सांगायचं  तर आज माझ्याबरोबरचे सगळे जण , आम्ही  चाळीशीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.वयामुळे आणि अनुभवांमुळे एक प्रकारची प्रगल्भता  साहजिकच आलेली आहे.जबाबदाऱ्या आहेत ,काळजी आहे , आमच्या मुलांकडून काही अपेक्षा आहेत,त्याचबरोबर त्यांचे निरागस बालपण टिकून राहावे याची मनस्वी धडपड देखील चालू आहे. त्यांच्यामध्ये आम्ही आमचे बालपण शोधण्याचा प्रयत्न करतोय.

काही जण करियरच्या यशस्वी शिखरावर आहेत  कित्येक जण परिस्थितीवर मात करून नवीन सुरुवात करत आहेत.शाळेत  मागच्या बाकावर बसून टिंगल टवाळी करणारी  मस्तीखोर मुले आज कित्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुढच्या आयुष्याची स्वप्न आहेत पण  कुठेतरी अजूनही आठवड्याभराच्या शाळेनंतर  येणाऱ्या रविवारच्या  सुट्टीची आठवण  मन अस्वस्थ करत  आहे .

आयुष्यातल्या या  टप्प्यावर जेव्हा परत आपल्याला गतकाळातल्या बालपणाच्या शाळेच्या  स्मृती पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळते तेव्हा  तो आनंद काय वर्णावा !!! २५ वर्षांनी  शाळेमध्ये पाऊल टाकण्याचा  आनंद आपल्याही नकळत आपल्या वयाचे ओझे उतरवतो आणि आपण पुन्हा एकदा शाळेचे विद्यार्थी होऊन जातो.

१९९४ साली उत्तीर्ण झालेल्या  बॅचचा जेव्हा रौप्य महोत्सव करायचे ठरले  तेव्हापासून  ते अगदी काल हा समारंभ  'याची देही याची डोळा' माझ्या शिक्षकांसोबत तसेच माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींसोबत साजरा करण्याची संधी मला मिळाली हे मी खरोखर माझं भाग्य समजते.

अशा या समारंभाची तयारी साधारण तीन महिने आधीपासूनच सुरु झाली होती. एक ना दोन अनॆक कामे . कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे  , शिक्षकांना काय द्यावे , शाळेसाठी काय करता येईल या वर सगळ्यांची मते घेण्यात आली.  काही विदयार्थ्यांनी पुढाकार  घेऊन कामांची जबादारी  घेतली. इतर  विद्यार्थी वर्गाला निमंत्रणे गेली . मागील अनेक वर्षात शिक्षकांशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आला . एवढेच नाही तर आजच्या मोबाइल फोन , व्हाट्सअप आणि फेसबुक च्या जमान्यात जिथे सर्व काही ऑनलाईन  करणे शक्य आहे अशा वेळीस  शिक्षकांच्या  घरी जाऊन निमंत्रण पत्रिका देण्याचे औचित्य साधण्यात आले. या पत्रिकांवर कार्यक्रमाला अनुरूप अशी  स्वलिखित कविता छापण्यात आली. आमच्या लाडक्या बाईसाठी त्यांना  उपयोगी पडतील अशा भेटवस्तू तसेच शिक्षक ,विद्यार्थीवर्गाला  स्नेहाचे प्रतीक म्हणून तुळशीचे रोपे घेण्यात आली.

पूर्वतयारी  झाली. आणि तो दिवस उजाडला  १५ डिसेंबर २०१९ . आमच्या सर्वांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस !!!!!
         

 शाळा सजली. प्रवेशद्वाराजवळची स्वामी विवेकानंदांची रांगोळी  आमच्या मनामध्ये  शाळेबद्दल असलेला सार्थ अभिमान जागृत करत होती. मंडप घातला गेला . फुलांची आरास , अत्तराचा घमघमाट, समई आणि दिव्याच्या मंद प्रकाश देणाऱ्या ज्योती , कार्यक्रम नीट पार पडावा म्हणून मदत करणारे असंख्य हात  आणि  याहून महत्वाचे म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा अमाप उत्साह . आजचा दिवस खासच होता . आमच्या सगळ्या बाई अगदी दिलेल्या वेळेवर आल्या. त्यांच्या डोळ्यात कौतुक होते. नमस्कारासाठी खाली वाकलो तेव्हा पाठीवरून फिरवलेल्या हातांध्ये एक माया होती. आशीर्वाद होते.

सरस्वतीपूजन, दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत गायन ,  शिक्षकांचे मनोगत  तसेच त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार , शाळेच्या आजी मुख्याध्यापकांकडून वृक्षारोपण , जुन्या संकलित फोटोचा  स्लाईड शो , विद्यार्थ्यांचे मनोगत, वंदे मातरम स्नेहभोजन   असा छान सुटसुटीत कार्यक्रम होता . रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शाळेच्या ग्रंथालयासाठी विविध विषयांवरची  २५ चांगली पुस्तके  देखील देण्यात  आली.
शाळेचे ऋण  फेडणे शक्यच नाही तरी देखील फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेतल्या शिक्षकांना वापरता येईल असा लॉकर  देण्यात आला. सामाजिक जाणीव ठेऊन शाळेतल्या १० गरजू विद्यार्थांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी सर्वानी  उचलली.
           वातावरणात एक प्रसन्नता होती.पारंपरिक वेशातले विद्यार्थी  आणि त्यांच्या शिक्षकांनी या समारंभाला जणू एका लग्न सोहळ्याचे  स्वरूप प्राप्त करून दिले होते.  हॉलवर एक सहज  नजर टाकली तेव्हा लक्षात आले काहींचे चेहरे  जुन्या आठवणींनी उजळले होते, काहींचे डोळे पाणावले होते, काही कौतुकाने भारावले होते, काही जण  जुन्या मित्र मैत्रिणींना नव्याने भेटत होते, काही जण अजूनही द्वाड मुलांसारखे मागच्या खुर्च्यावर बसून कार्यक्रमाची मजा घेत होते. काही जण कार्यक्रमाच्या नियोजनात व्यग्र होते.
वेगवेगळ्या  दिशांना पांगलेली पाखरे आज या वास्तूमध्ये एकत्र जमली होती. जेव्हा मनोगत व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा कोणी अगदीच मोघम बोलले , कोणी अगदी भारावून गेले आणि  कोणी आपल्या भावनांना कवितेचा सुंदर साज  चढवला.
हा  सोहळा मनाच्या कॅमेराने केव्हाच टिपला होता पण तरीदेखील सर्व शिक्षक तसे विदयार्थी वर्गाचा एक छान सामूहिक फोटोंचा कार्यक्रम झाला आणि आमच्या आयुष्यातला सुंदर दिवस त्या कॅमेरात  कायमचा कैद करून ठेवला गेला.

निरोपासाठी हात हलले . पुन्हा भेटू आणि भेटत राहू अशी  आश्वासने दिली गेली . दिवसभराचा मांडलेला पसारा परत नीट आवरला गेला . तृप्त मनाने आम्ही पुन्हा एकदा घराकडे निघालो.  जाण्यापूर्वी मी एकदा शाळेच्या इमारतीकडे बघितले  आणि  मनोमन हात जोडले.
कुठेतरी  वाचले होते, ' डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी  आठवणीतली शाळा कधीच संपत नसते . इथले वर्ग कधी सुटत नसतात . आपल्या भूमिका बदलतात.  पाठीवरील  दप्तराची जागा ऑफिसची बॅग घेते . शाळा मात्र  नव्या चेहऱ्यांसोबत पुढील पिढी घडवण्यासाठी तिथेच उभी असते दीपस्तंभासारखी !!!!

शाळा म्हणजे आपल्या गतजन्मीचा पुण्यसंचय जो आपल्याला आयुष्यभर प्रेरणा देत राहतो , आपल्याला वाट दाखवत राहतो.
नेहमीसारखेच आई बाबा वाट बघत होते .नेहमीसारखेच सार काही ऐकायला ते उत्सुक होते . त्यांच्या डोळ्यात कौतुक होते . त्यांना सगळं सांगताना, फोटो आणि व्हिडीओ दाखवताना मी तो दिवस पुन्हा एकदा जगले.

घरी आले तेव्हा जुई तिच्या खोलीत अभ्यास करत होती. दहावीचं वर्ष , शाळेचा शेवटचा आठवडा  असल्यामुळे तिच्या मनाची होत असलेली तगमग , बोर्डाच्या परीक्षेची तयारी, मैत्रिणींसोबत असलेले हवंहवंसं वाटणार सुंदर सुरक्षित जग आता कुठेतरी हरवून जाणार याची तिला वाटणारी खंत हे सगळं मी गेले काही दिवस  बघत होते, एक आई या नात्यामधून.
आज पहिल्यांदाच एक मैत्रीण म्हणून या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली.तिने माझ्याकडे हसून बघितलं. काही  वर्षांपूर्वी माझा हात सोडून ती शाळेत गेली . 'शाळा खूप छान आहे पण तू तिथे का नसतेस ग' असं निरागसपणे विचारणारी , पहिल्यांदा मिळालेला मॉनिटरचा बिल्ला हाताच्या मुठीत  घट्ट पकडून  बसमधून उतरल्याबरोबर मला दाखवणारी  माझी मुलगी आता  सुखद आठवणींचा खजिना घेऊन  काही दिवसातच  शाळेच्या उबदार घरट्यातून उंच भरारी  घेणार आहे पण माझ्याइतकीच तिच्या मनातली शाळा देखील कधीच संपणार नाही , तिची शाळा कधीच सुटणार नाही हे निश्चित !!!!!









Thursday 21 November 2019

The secret: Keep going!!!!

It was 4 am in the morning I was soaked in sweat as I woke up and realized that there was no electric supply the previous night .  Yet another grueling day ahead!!!!!
Though I did not feel like getting up that day I had no option but to start my routine and eventually the daily chores started.

There was no end to the daily activities starting right from the breakfast, the tiffin,  rush for the school timing, morning walk,early morning classes, laundry and other household  tasks.

There was no sign of rain even after we were long into monsoon season. hence I thought of  adding yet another task to my list -- weekly visit to my parents.

I moved out in a hurry to catch the train . As I was walking towards the railway station I realized that I was drenched in sweat almost cursing everyone around me including the rush, the unwanted crowd, the pollution, sound of vehicles, scorching heat.
Not only that few always blamed to be things like unannounced holidays of maid,few repairing work at house,increasing cost of goods. To add to that I could see clouds rapidly gathering in the sky I realized that I had not taken umbrella.Now it was time to curse myself for not being prepared or rather not being able to keep up with the pace of life.
I started to rush towards the station before rain starts. but alas!!!It caught me and I had to take shelter  in front of closed shop.

The entire world came to a grinding halt!!! Rain made everybody to cut their pace and wait..I could still visualize long  'to do' list to be completed. I was becoming more and more nervous. Rain had given me no option but to wait!!!

And then a thought came to my mind....What is making me do so many things at a time? What is keeping me motivated all the time? Why I am waking up  early at 4 am  everyday? Why I am not preferring to have a good peaceful sleep on weekends? Why am I  aspiring to be perfect in everything I do?Why I m accompanying my 14 year old daughter early at 5 am for her studies? Why??  I really wondered . Why I am hastily making few good dishes  for my parents  and running all the way taking train journey just to see their happy faces? What keeps me  organized and  makes me detailing out every task to look after after my beautiful home? What is it which  encourages  me to pursue my dreams ,testing my abilities to make myself independent in the midst of  all the responsibilities? what is making me read and collect good books , listening good songs , what is making write , what is making meet my friends ? what is making me to be able to teach my students?This why was making me nervous and I was getting lost in the thoughts. What is that unknown form of energy , something which is not visible but flows within me which makes me care for my family , for myself . That unknown motivation.

As thoughts were picking up speed in my mind so was the rain outside!!!!!The narrow lanes and roads were getting splashed up by water with a touch of fresh earthy scent.


The  pleasant fragrance filled up my heart ,it cleared my thoughts and brought peace to my heart. It seemed I got answer to all my questions.I had a thunderstorm both inside as well as outside There was no mandate which was was making me forcibly do things  but it was a hope which kept me going. A desire of seeing a smile on my  daughters face as she comes  back from school, a hope to create a beautiful human being from a tiny baby which I had given birth few years back, a desire to express my love and gratitude towards my parents who live their entire life just to make me happy and successful, an aspiration to do something good , to invent myself  a desire to  make  myself a responsible human being,a feeling of satisfaction  which I get when I look at my neat and tidy home, a sense of gratification on my partners face . a kind of satisfaction when I teach my favourite subjects, a contentment  when parents of my students give me a positive feedback. a smile I deserve when I am able to keep up all habit in my habit tracker. I think more than what we do  for others in our close knit circle , their happiness and their well being  matters to us the most.

Station still looked crowded and chaos continued. Sudden downpour washed away all the dirt  and it gave me a perspective to speculate myself.
Meanwhile rain had stopped . I saw a small school going girl   trying to catch raindrops and splashing it on her face. It was simply a joyful moment to watch her. This is life. A  small ray of happiness which gives hope.
Many times we try to achieve  lot of things at a time  and then we get stressed if we are not able to meet a deadline, We keep worrying about small things and negativity fills up mind at quicker rate. Life is all about dreaming with open eyes. Fighting and struggling to achieve it, Some times  we loose sometimes we win but every time we learn. The real winner is the one who gathers up his courage to achieve something new  and just keep himself going!!!!!!!

With that positive thought in my mind I quickly collected my halted pace and boarded the train with a smile of happiness .....





Friday 14 July 2017

साठवण

शाळेचा निरोप समारंभ हि आयुष्यात न विसरता येण्यासारखी गोष्ट. १० वी च वर्ष असत. शाळेच्या उबदार पंखाखाली विसावलेले आपण काहीसे स्वप्नाळू झालेलो असतो . महाविद्यालयाची रंगीबेरंगी स्वप्न डोळ्यापुढे तरळत असतात. बरेचसे तणावाखाली असतो  किती मार्क मिळतील आणि आपण पुढे जाऊन कोण होणार या आणि अशा अनेक विचारांनी मनाला एक विलक्षण हुरहूर लागून राहिलेली असते.  आणि त्याच वेळी मन खूप हळवं झालेलं असत. शाळेच्या रोजच्या एका सुरक्षित वातावरण येण्याची सवय असते आपल्याला.

१० वीच्या निरोप समारंभाच्या  वेळीस माझ्या मनात नेमक्या याच भावना होत्या. आतापर्यंत घट्ट धरून ठेवलेले मैत्रिणींचे हात आता  सुटणार होते .डोळ्यात खूप स्वप्न होती . .आणि अशा वेळीस समोर प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलायला उभे होते लेखक कवी प्रवीण  दवणे . सर खूप सुंदर बोलले त्या दिवशी. शाळेविषयी, आयुष्यातील नवीन येऊ घातलेल्या बदलाविषयी , मैत्रीविषयी. आयुष्य भरभरून जगायला शिका .नुसतं शिक्षण घेऊ  नका   माणूस घडवायला शिका. असं काहीस छानस . मला आठवतंय  घरी आल्यावर देखील मी कितीतरी वेळ आई बाबाना त्या  भाषणाबद्दल सांगत होते. मराठी पुस्तक वाचायची आवड होती. घरी ' विवेक ' हे साप्ताहिक  यायचं त्यात प्रवीण दवणे सरांचे  लेख असायचे. पण प्रत्यक्ष त्यांना बोलताना बघणं आणि त्यातलं सगळं साठवून ठेवणं हा एक विलक्षण अनुभव होता.


आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी जुई  जिथे कथक शिकते त्या स्वानंद कला प्रसारक  केंद्राचा एक कार्यक्रम होता. ध्यास स्वप्नपूर्तीचा . विविध क्षेत्रात  एखाद्या गोष्टीच्या ध्यास घेऊन शून्यातून विश्व्  उभं करणाऱ्या काही महान व्यक्तीच्या कार्याचे स्मरण या कार्यक्रमात केले जाणार होते तसेच कथकचे शिक्षण  घेणाऱ्या मुलींना देखील या कार्यक्रमातुन  प्रेरणा मिळावी असा एक छान हेतू होता. तर  या  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले होते  'प्रवीण दवणे  सरांना.  हा तर दुग्ध शर्करा योग होता . आणि त्याहून अत्यंत छान गोष्ट अशी होती कि  जुई आणि तिच्या सोबत  कथक शिकणाऱ्या स्नेहा काकू  यांना निवेदनाची जबाबदारी दिली होती.  जेव्हा ताईने आम्हाला हे सांगितले तेव्हा मला खूपच छान वाटले. एक कालचक्र पूर्ण झाल्यासारखं वाटले .

सर्वात कठीण गोष्ट होती सर्व निवेदन लिहून काढण्याची. ओघवत्या भाषेत स्वच्छ  शब्दात त्यांच्यासमोर सादर करण्याची. सरांची काही पुस्तकच मदतीसाठी धावून आली.

मधल्या काळात खरतर सरांची पुस्तक मी अजिबातच वाचली  नव्हती. प्रामाणिकपणे सांगायचं तर  आता एवढं अलंकारिक मराठी  वाचायची सवय सुटली होती. मध्ये बाबानी त्यांच्या लायब्ररीतलं सरांचं  एक पुस्तक दिल होत . तेवढच काय ते


घरात जुईच्या मराठी वाचनाचा तसा आनंदच होता. जुईच्या मराठी वाचनाची धाव  फक्त बोक्या सातबंडे  तोतोचान  गोट्या  आणि तत्सम पुस्तकांपर्यंत .

 पण मग निवेदन लिहून काढलं  दोन चार वेळा छान प्रॅक्टिस  देखील झाली.  मला काही कारणास्तव काही वेगळे कार्यक्रम आधीच ठरलेले  असल्यामुळे जुईच्या या कार्यक्रमाला पूर्ण वेळ जाता आले नाही. कार्यक्रमाचा पूर्वार्ध बुडाला होता. त्यामुळे सरांचं व्याख्यान काही ऐकता आले नाही.  धावत धावत हॉल वर पोचले तेव्हा आभार प्रदर्शनाचा  कार्यक्रम चालू होता . नंतर काही नृत्य आणि जुईची दोन चार निवेदन ऐकता आली.

कार्यक्रम संपला मात्र मी जुईला घेऊन सरांकडे गेले. मनात काही वेगळ्याच भावना दाटून आल्या होत्या. सरांची काही पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती त्यातलं एक पुस्तक विकत घेतलं. त्यावर सरांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी जुईचे कौतुक केलं छान बोलली म्हणाले. खूप अभिमान   वाटला .

मराठी देखील वाचत जा  म्हणाले . आम्ही दोघीनी हसून  मान  डोलावली.

हॉल मधून बाहेर पडले . मन एका वेगळ्याच जगात जाऊन पोचले होते. खूप प्रसन्न वाटत होते. आयुष्यात काही गोष्टी  देव न मागता देतो याची प्रचिती आली त्या दिवशी. रात्र झाली होती  जुईचा हात हातात होता. पावसाची रिपरिप चालूच होती. मला काही वर्षांपूर्वीची ती निरोप समारंभाची संध्याकाळ आठवली शाळेच्या निरोपाची, सरांच्या व्याख्यानाची. मधली काही वर्ष जणू पुसून गेल्यासारखी. मी जुईकडे बघितलं तर ती खूप दमली होती पण खूप आनंदात  दिसली . सर कसे बोलले काय बोलले  हे तिच्याकडून जाणून घेण्याची मला इच्छा होती. सर चांगले बोलले  म्हणाली.   एका जागी साठून राहिलेलं डबक्यातील पाणी आणि खळाळणारा निर्झर   यांची मानवी स्वभावाशी केलेली एक छान तुलना   मात्र तिला छान समजली  होती तिने ती तशीच्या  तशी मला सांगितली. 
जे भारावलेपण  मी अनुभवलं  , जेवढं प्रेम  मराठी भाषेवर आम्ही केलं तेवढं जुई करणार नाही कदाचित  पण सरांच्या आजच्या व्याख्यानाच मर्म तिला  थोडं कळून चुकलं होत.  माझं व्याख्यान चुकलं होत पण जिच्यावर ते संस्कार व्हायची  गरज  होती तिला ते थोडं फार  का होईना पण कळलं होते.
भाषा हे खरतर माध्यम असत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं. प्रत्येक भाषेचं स्वतःच एक  सौन्दर्य  असत एखादी  व्यक्ती मनापासून बोलत असली कि त्या भावना समोरच्यापर्यंत नक्कीच पोचतात.

 मराठी भाषेचं  बोट पकडून आम्ही शिकलो. जिने आम्हाला ज्ञात केलं आम्हाला  घडवलं. या भाषेची अवीट गोडी  अधिकच सुंदर करणाऱ्या पुस्तकांवर पण आम्ही मनापासून प्रेम केलं. या पुस्तकातून सुंदर शब्दातून प्रेरणादायी ठरणाऱ्या  अशा असंख्य लेखकांना मी मनातल्या मनातच हात जोडले.


(ता.क.  अशी छान  संधी जुईला दिल्याबद्दल स्वाती  ताईची मी मनापासून आभारी आहे) 











Wednesday 21 September 2016

राधेय मृत्युंजय आणि हॅरी पॉटर




 परवा  रविवाराच्या लोक्रंग  पुरवणी मधे मृत्युंजयचे मन्त्र  भारले दिवस असा  लेख वाचण्यात  आला.
मृत्युंजय कादंबरी साधारण १९६७ साली प्रकाशित झाली . २०१६ हे या कादंबरीचं  सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्या संदर्भात हा लेख आला होता. लेख वाचला आणि   कित्येक जुन्या  स्मृतींना उजाळा  मिळाला .

साधारण  आठवी आणि नववीच्या सुट्यामध्ये मी सगळी  प्रसिद्ध  पुस्तक वाचून काढण्याचा सपाटाच  लावला होता हे  पक्के   आठवत  आहे.

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे शालेय जीवनात मी मराठी वाचन जास्त केलं. शब्दांच्या त्या राज्यात रमायला  मला खूप आवडायचं. ऐतिहासिक  कादंबऱ्याचे तर वेड लागले होते. स्वामी , श्रीमान योगी, छावा अशा कित्येक कादंबऱ्या तेव्हा सलग वाचून काढल्या होत्या.


विशेषतः उदात्त आणि विशाल हृदयी , दानशूर  अशा   अलौकिक व्यक्तिमत्वाची कर्णाची अविस्मरणीय कथा सांगणारी राधेय आणि मृत्युंजय तर जास्त आवडीची झाली होती.  मी  राधेय आधी  वाचल कि मृत्युंजय  ते काही  आठवत  नाही पण  वस्तुतः सूर्यपुत्र  असलेल्या  आणि  कायम सूतपुत्र  म्हणून अवहेलना सहन केलेल्या अंगराज कर्णाला  केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या दोन्ही  कादंबऱ्यांनी मनाचा पूर्ण ताबा  घेतला होता . परत परत पुस्तक आणून  मी त्या कादंबऱ्या वाचल्या होत्या.

कर्णावर  झालेला अन्याय त्या वेळी खूप असह्य व्हायचा एवढा मोठा योद्धा असून कर्ण  कायमच उपेक्षित राहिला याच खूप   वाईट वाटायचं .  पुस्तकातली पानं  च्या पानं  तेव्हा तोंडपाठ झाली होती.
त्या वयात कर्णाची झालेली अवहेलना खुपली आणि परत परत वाचाविशी   वाटली.


आता तुम्ही म्हणाल राधेय , मृत्युंजय मध्ये तर कर्णाचा धागा समान आहे मग आता हा तिसरा हॅरी पॉटर  यांच्या रांगेत का बरे बसवला आहे. तीनही  पुस्तकातला समान   धागा आहे  भारावून टाकण्याचा . मृत्युंजय राधेय या कथांना  महाभारतातील  कथेचा आधार होता आणि या हॅरी पॉटर नामक fiction रुपी झंझावाताला  तसा  वास्तवाचा आधार काहीच नाही .
कल्पनेच्या जगात स्वैर मुशाफिरी करणारा ,जादूचे प्रशिक्षण घेणारा, आपल्या साहसाने व कौशल्याने दुष्ट जादूगाराशी  लढा देणाऱ्या   या हॅरी पॉटर नावाच्या  कथानायकाने   आणि अकल्पित  तसेच  चित्तथरारक घटनांनी खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकाने वाचकांना भारावून  टाकले आहे.

ज्या वयात मी राधेय  श्रीमान   योगी हि  पुस्तके वाचली त्या पेक्षा कमी वयाची असताना आज माझी मुलगी  आता या  हॅरी पॉटर ची पारायणे करते आहे.

 खरंतर या हॅरी पॉटर बद्दल मला काही फारशी माहिती नव्हती. तिला वाचायची आवड होती त्यामुळे आम्ही तिला काही महिन्यांपूर्वी हॅरी पॉटर चे एक पुस्तक बक्षीस म्हणून दिले
त्यानंतर तिने त्याची पुस्तके वाचायचा सपाटाच लावला आहे.
 हि पुस्तके खूप  मोठी  आणि महाग देखील  आहेत. त्यामुळे आम्ही तिला  एक target  देत आलो आहोत. अमुक एक गोष्ट केलीस तर नवीन पुस्तक . पण पुस्तक आणून द्यायचा अवकाश ती ते कधी  वाचते  वाचून कधी संपवते तीच तिलाच माहिती . लगेच पुढच्या पुस्तकाची मागणी झालेली असते.

मला तर या पुस्तकाच्या लेखिकेची कमाल  वाटते इ स १९९० साली मँचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना स्फुरल्याचे म्हटले जाते.
हॅरी पॉटर चा सातवा भाग २००९मध्ये आला होता त्यानंतर त्याचा आठवा  भाग आता २०१६ मध्ये आला  आहे . तब्बल ९ वर्षाच्या गॅप नंतर झालेल्या  त्याच्या एन्ट्री  चे लोकांनीही भरभरून  स्वागत  केले आहे

काळ बदलला ,कर्ण   इतिहासजमा झाला आणि हॅरी पॉटर आला . ऐतिहासिक वास्तवदर्शी कादंबऱ्या जाऊन काल्पनिक कादंबऱ्या आल्या .आईचे मराठी वाचन मागे पडून मुलीचे इंग्रजी वाचन सुरु झाले. फक्त एक गोष्ट बदलली नाही आणि ती म्हणजे वाचनाची आवड.

रणजित देसाई , पु ल देशपांडे शिवाजी सावंत यांच्यासारखे वाचकांना भारावून सोडतील असे मराठी लेखक आता उरले नाहीत . मनावर खोल ठसा उमटवणारी मराठी पुस्तके देखील फारशी लिहिली जात नाहीत . त्या  पुस्तकांची जागा आता आकर्षक वेष्टनातल्या इंग्रजी पुस्तकांनी घेतली आहे . पण भारावून टाकणारा तो धागा मात्र  तसाच आहे.

तहान भूक विसरून , क्वचित कधी अभ्यासाचा पसारा मागे सारून पलंगावर उलटे उताणे झोपून  पुस्तकामध्ये एकटक तंद्री लावलेल्या माझ्या मुलीला बघितले कि मला खूप छान वाटते.मला काही वर्षांपूर्वीची मी आठवते. ती बरेच वेळा मला पुस्तकातल्या  आश्चर्यकारक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते.मी फक्त हसते मनातल्या मनात सुखावते .  आई बाबानी माझ्यावर केलेले  वाचन संस्कार , चांगल्या गोष्टी बघण्याची लिहिण्याची निर्माण केलेली आवड  जेव्हा तिच्यामध्ये देखील दिसून येते तेव्हा एक वर्तुळ  पूर्ण झाल्यासारखे वाटते.


आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें ।
शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं



शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां





   अजूनही मी मॅजेस्टिक  मध्ये जाऊन दोन तीन महिन्यातून एकदा पुस्तके खरेदी करत असते. मराठी सोबत इंग्लिश पुस्तके देखील बरीच  वाचते पण काळ वेळ  विसरून  अधाशासारखी पुस्तके आता वाचली जात  नाहीत.  त्याच काही वैषम्य देखील  वाटत नाही. पण त्याच बरोबर नवीन पिढीत हे वाचनाचे वेड वेगळ्या स्वरूपात का असेना पण शिल्लक आहे हे हि नसे थोडके!!!!!!