स्त्रीसमर्थ
ती ...... खरच सबला आहे??
कोण ती ???
आपल्या मनातली हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारण्यासाठी सत्वगुणांचे बाळकडू देऊन लढाऊ शिवराय घडवणारी ती
इंग्रजांच्या हुकुमशाहीला मेरी झासी नाही दुंगी असे निक्षून सांगणारी ती ???
तीच ..............
रूढी परंपरेने सती न जाता होळकरांचे राज्य समर्थपणे चालवून समाजसुधारणेत क्रांती घडवणारी
ती ??
भारतीय स्वातंत्र लढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढलेली ती ???
केशवपन,विधवा विवाह यासारख्या पूर्वापार रूढीना आव्हान देणारी ती ???
आपल्या सावलीच्या सोबतीने स्त्रीशिक्षणाचा अमृताचा वसा घेणारी ती???
तीच ती.........
लाखो अनाथ मुलांना आईची माया आणि हक्काचे घर देणारी ती.
तीच स्त्री ...
अंतराळात आपले पाऊल टाकून देशाचा ध्वज उंचावणारी ती
गुन्हेगारांना धडा शिकवणारी पहिली महिला पोलिस अधिकारी
नामवंत कंपन्यांचे कारभार सहजेतेने सांभाळणारी ती
लोकलची वारी करून थकलेली तरी घरासाठी झटणारी ती ...
सर्व क्षेत्रात वर्चस्व स्थापन करत असताना आपल्या घरातल्या पिल्लांना पंख देणारी ती
ती स्त्री ...
कि .................
घरात आणि घराबाहेर कित्येक आरोप सहन करणारी ती
बेपर्वा शैतानांच्या जाचाला बळी पडलेली ती
घराण्याला वंश देण्यासाठी स्त्रीभ्रूण हत्येचे पातक करणारी ती???
स्वताचे पाप लपवण्यासाठी निष्पाप जीवाला रस्त्यावर सोडून जाणारी
स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावत समाजात बेधुंदपणे वावरणारी ती ???
आपल्या मयार्दा सोडून प्रसिद्धीचा सोस बाळगणारी ती
ती स्त्री
खरोखर समर्थ आहे का???
ती शिकली...
रमाबाई ,सावित्रीबाईनी घडवली
ती खरोखरच जाणते का स्वातंत्र्याचा अर्थ ??
तिच्यासारख्या कित्येकिंच्या पुढाकारामुळे ती इथवर आली
ती जाणते का यातले मर्म???
ती शिकली...
रमाबाई ,सावित्रीबाईनी घडवली
ती खरोखरच जाणते का स्वातंत्र्याचा अर्थ ??
तिच्यासारख्या कित्येकिंच्या पुढाकारामुळे ती इथवर आली
ती जाणते का यातले मर्म???
शेकडो मैल चालत आली ती
जुन्या चालीरीतींना मागे टाकत
आपला रस्ता स्वतः शोधत...............
पुढच्या पिढ्यांना नव्या दिशा दाखवत .......
तिला खुणावतो आहे क्षितिजावरचा तारा
तिने जगावे स्वछंदपणे
मोकळा श्वास घ्यावा निर्भीडपणे
तिच्या मर्यादा तिचे संस्कारतिची चौकट तिचे विचार
तिने करावा मुक्त संचार
तिच्या जगण्यातच तर
सारे जग जगणार !!!!!!!!!