Tuesday 29 May 2012

MehfilRadio - Internet Radio for the students and by the students

Before VCD DVD, video tapes television was the age of RADIO 
Radios in those days  allowed people to have news, music, and other entertainment at their fingertips . The best part of all, it was free as long as you could afford a radio.
Radios indeed revolutionized the world. Many things have changed in this fast paced world. We should be thankful radios still have place in our lives..

Waking up to a devotional Abhang or a classical by Kishori Amonkar on FM Rainbow which broadcasts marathi songs or enjoying pulsating breakfast show on radio Mirchi by Jeeturaj that most of mumbaikars listen to on their way to work or cuddling up in a bed with old melodies on Purani Jeans  By RJ Anmol.  Remember , they all have one common  powerful thing which suiths our heart , our senses  which makes us happy,share our joys or sometimes accompanies us when we are alone .That is Music!!!!
After the silence that which comes nearest to expressing the inexpressible is Music '!!!!!! So true.Music is unique.It surpasses all the boundries of religion and cultures

Well all this introduction was to tell you all about a site called http://www.mehfillive.com/   MehfilLive Internet Radio is an Indian Classical Music platform. They broadcast classical music produced by young, aspiring musicians. The goal is to provide a platform for students so that their music can be heard by thousands of people around the world.
This radio is developed by the students and for the students of music. The founder members and artists of this site stay in Cupertino,California. The team has started broadcasting the musical programmes by various students who stay in Bay area including Tabala , vocal recital, compositions from the concerts. Recently they had pleasure of meeting Shree Shridhar Phadakeji at their place and had broadcasted GeetRamayan sung by him. The programmes are broadcasted on weekends . Please check the timings as you may have to use timezoneconverter.com to check up with the IST timings. The site http://www.mehfillive.com/ and the facebook pages MehfilLiveradio and mehfillive will update you with the programmes.
Youcan listen to the music on your computer or one can download the iphone/android applications from mehfillive's website.
If you would like your music to be broadcasted on Mehfilradio you will have to create your account on their website.You can be a content provider for this internetradio.
Lastly I want to conclude by saying  that the young , aspiring  minds away from Indian land  are learning ,promoting as well as popularizing the Indian classical form of music is worth appreciating. The elders are always blaming the younger genreation by saying that they dont value our rich Indian culture and forms of  music In such circumstances Mehfillive by Ashish Tare and team should be promoted and heard . Kudos to their team.



















Please Note  that Shree Satish Tare who is also part of this team conducts Tabala classes in Bay area.
Satish has been teaching Tabla in USA for the last 10 years and has earned the reputation of being the most respected Tabla teacher among students based in Cupertino, San Jose, Santa Clara, Sunnyvale, San Francisco, Milpitas, Fremont, Pleasanton, Dublin and other nearby towns in the Bay Area of California. He has a large number of students from these regions, who are seriously learning from him.

Thursday 24 May 2012

१४ राजकन्या

नाव जरा वेगळंच वाटते आहे न ' १४ राजकन्या' . मागच्याच आठवड्यात लेकीसोबत लहान मुलांची नाटक बघण्याचा योग आला. त्यावेळीस पहिलेल  हे नाटक १४ राजकन्या. खूपच आवडलं. समोर बसलेल्या नवीन पिढीला त्यांच्या संस्कारक्षम मनाला एक चांगला विचार देण्याची ताकद होती या छोट्या नाटुकल्यात......
सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा
हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा
या  गाण्याने नाटिकेची सुरुवात झाली. सारे जहासे अच्छा असा विविध परंपरानी  नटलेला नानाविध संस्कृती एकत्र नांदणारा भौगोलिक दृष्ट्या सक्षम असलेला असा भारत देश... या आपल्या भारत देशात वेगवेगळे प्रांत आहेत . प्रत्येकाची संस्कृती,तिथे साजरे केले जाणारे सण वेगळे   तिथे बोलली जाणारी भाषा वेगळी. तर  एकूण १४ प्रांतांचे आणि तिथल्या भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा त्या १४ राजकन्या. प्रत्येकीने   थोडक्यात पण समर्पकपणे  त्या भाषेची माहिती सांगितली अर्थात मुलांना आवडेल अशा नृत्य आणि गाण्याच्या माध्यमातून.  
नंतर सुरु झाली त्या १४ राजकन्यातील  भांडणे. सगळ्याच स्वतःला श्रेष्ठ म्हणवून स्वतःचे गुण गाण्यात रमलेल्या. मग भले तामिळी आणि केरळी बाजूबाजूला आहेत पण एकमेकींचा मोठेपणा मान्य करून घ्यायला कोणीच तयार होत नव्हते. तशातच प्रश्न आला तो म्हणजे राष्ट्रभाषेचा  सन्मान कोणाला देण्यात यावा? अशी भाषा जी जास्त बोलली जाते जी आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व  करू शकेल.त्यावेळी एक आजी प्रवेश घेते हि प्रतिनिधत्व करते सर्वच भाषांची जननी असलेल्या 'संस्कृत' भाषेचे .संस्कृत साहित्यात सर्व विषयावरील ज्ञानाचे अपार भांडार आहे.भारतीय संस्कृतीचा पायादेखील हे संस्कृत साहित्यच आहे .  हि संस्कृत रुपी आजीच मग या सगळ्या भाषांना एकत्र आणायचा प्रयत्न करू पाहते.अखेर सर्वानुमते ठरते  खरे कि तो मान हिंदी भाषेला देण्यात यावा. पण आपापसात  या राजकन्या ची  धुसफूस  चालूच राहते .
अशातच प्रवेश करते  ती  जागतिक दृष्ट्या अत्यंत सक्षम समजली  गेलेली  आणि वर्चस्व स्थापन केलेली  'इंग्रजी' भाषा  . हि राजकन्या येते काय आणि सगळ्या लोकांचे लक्ष वेधून घेते काय. तिचा प्रभाव वाढू लागतो आणि लवकरच तो राष्ट्रभाषेचा मुकुट ती हिरावून घेऊ लागते. बाकीच्या १४ राजकन्या निमुटपणे पडून राहतात. करतील काय?? लोकांनीच त्यांची अशी अवस्था करून टाकलेली असते, नवीन पिढी फक्त आणि फक्त या दिमाखात राजमान झालेल्या इंग्रजीची  गुलाम झालेली असते.आपल्या मुलाला एकवेळ स्वतःची  मातृभाषा आली नाही तरी चालेल परंतु इंग्रजी तर यावयासच हवी. इंग्रजीतून संभाषण करणारा तो 'Most sophisticated ' आणि मातृभाषेतून संवाद करणारा मात्र 'ill mannered '. आपल्याच प्रांतात आपलीच गळचेपी या भाषा फक्त  सहन करत राहतात. सांगणार कोणास? या भाषांना संजीवनी कोण देणार ? एवढ्यात एक चिमुकला जवान तिथे येतो आणि त्या भाषांना सजीव करतो .
 परक्या भाषेला आपलेसे करून ती भाषा अंगीकारणे हि  सन्मानाची गोष्ट आहे पण आपल्या मातृभाषेला विसरून दुसरी भाषा स्वीकारणे हि शरमेची बाब आहे.
किती छान संदेश दिला आहे या नाटकातून. आपल्याला पुढे जायचे असेल , खूप प्रगती करायची असेल तर ज्या भाषेत भरपूर माहिती उपलब्ध आहे जी भाषा जागतिक स्तरावर स्वीकारली गेली आहे अशा इंग्रजी भाषेमध्ये आपले प्रभुत्व निश्चितच सिध्द केले पाहिजे . पण त्याच वेळीस आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये. आजच्या पिढीला हे कळणे अत्यंत जरुरीचे आहे.
ICSE आणि CBSE  शाळामधून मराठी हा विषय आता optional  केला गेला आहे. अशा वेळीस पोट धरून  हसायला लावणाऱ्या पुलंच्या मार्मिक कोटया,हिरवे हिरवे गार गालिचे कवितेतून दाखवणाऱ्या बालकवींच्या कविता,शिवाजी महाराजांचे चरित्र उलगडून  दाखवणारे श्रीमान योगी, पाडगावकर, अत्रे, चि.वि, खांडेकर,शांता शेळके मुलांपर्यंत न गेले तर याला जबाबदार कोण??? अर्थात पालकच.बोलायला लागल्यापासून ज्या स्वाभाविक भाषेत आपल्या विचारांचा विकास होतो ती भाषा कायम धरून ठेवायला आपणच मुलांना शिकवलं पाहिजे .
नाटक संपताना मुलांना एक प्रश्न विचारला गेला . 'मुलानो तुम्हाला मराठी भाषा आवडते कि नाही ?' मुलांनी एवढा तगडा होकार भरला त्यावरूनच लक्षात येत कि या भाषा हे फक्त मध्यम आहे विचार मांडण्याच .
 हे नक्की मनाशी ठरवायला हव,  शिक्षणाच्या क्षेत्रात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत असताना आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये. 
 मुलांना त्यांच्या मातृभाषेपासून अलग न करता त्याचीच कास धरून स्वतःची आणि पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधा असे सांगणारा  नाटकाचा हा प्रयोग खूपच स्तुत्य आहे. यासाठी त्याचे दिगदर्शक 'राजू तुलालवार' यांचे कौतुक केले पाहिजे. मुलांना समजतील आणि त्यांना कळतील अशा मनोरंजक माध्यमातून सादर केली जाणारी त्यांची नाटके उल्लेखनीय .मुले पोट धरून हसतात,उत्स्फूर्त दाद देतात आणि परत जाताना सोबत एक विचार घेऊन जातात.

Thursday 17 May 2012

Remembering the Unforgettable

I still remember the days when  television programmes were telecasted only for 4 hours per day and there was only one channel to choose from. I  still remember  those old Doordarshan days on B&W TV when we used to wait for entire week to watch  Ramayana .The days when serials kept our entire family glued to the couch .. The days when streets went silent to watch B.R. Chpora's Mahabharat. Days when people survived without internet and posted cards to participate in programmes like 'Surabhi'...The phenomenal days when people gathered in crowds to watch the telecast. Good old Days!!!!!

A  video cassete on rent costed around Rs 7 at that time... We had very kind neighbour Mr Padmnabhan . He had TV with VCR .. It fascinated us like any thing at that time.. I belonged to a simple middle class family where B&W TV was a luxury.Myself along with my sister and our friends from the society would request him to allow us to watch the new film on his TV and VCR. He would readily agree and we would then contribute Rs. 1 each to bring that video cassete from nearby shop on rent and would grab our seats at uncles house to watch that movie on sweaty afternoon in May... Uncle was really helpful and never showed any kind of attitude infact enjoyed the movie with us..
 Asking for a rupee from my mother for that contribution was also not an easy task but she would readily agree as we were to watch the movie in the society itself. I remember watching few Jeetendra movies and 'Ram lakhan' . That was fun really ..It was not so that theatres  were not there or we had to take a long walk to reach but it never occured to us to go for movie instead with that contribution. It was fun calling out friends discussing ,fighting and then concluding on which movie to go for and then taking turns to the shop for that cassete.
The movies those telecasted on weekends was a great  family time indeed . Saturday was for marathi movies and sunday was for hindi movie..The weeknend evening were long awaited for that Vikram and Vetal show followed by the movie .It was perfect family time sitting in front of TV for long hours Oh fun!!!!  This was before the cable TV was invented in India. To take subscrption of cable TV we had to pay that extra money and cable TV showed 2 movies per day one in the afternoon and one at night. timings were fixed too..We had to take long efforts before this cable TV actually entered in house as my father was very much reluctant for allowing his daughters to watch two movies a day... But soon he agreed and we had that luxury of watching movie at the comfort of my home then..I remember watching ' Maine Pyar Kiya' on this cable TV. One of my friend from the society came over and asked me to put it on. We were so thrilled  we watched it again the next day. Cable TVs used to retelecast the same movie again in the morning hours... It was magical really...

                                                    
 Writting this is like nostalgic trip down the memory lane when life was   really simple. when the only visual entertainment was Television. It would take another page or two if I start mentioning the TV serials telecasted on Doordarshan those days.. Remember Surabhi,Nukkad,Ye jo hai Jindagi,Fauji,Circus,Flop Show,Hum Log , Karamchand ,Malgudu days,Mr.Yogi,Wagale ki Duniya,Ulta Pulta,Rajani????Those were the masterpieces List is endless the more I remember the more  I am missing it...


We have so many channels which telecast movies including news ,daily soaps,sports,cartoons  one after the other.They are available at a click of button  but now during my free time also I just never grab that remote control and watch the movie..Nobody is  having great interest and time to sit by and watch..Times have changed. .Gone are the days of 21 inch B&W sets.A flat screen TV with spohisticated features is the order of the day..But the kind of fun and quality of the programme we had was much more superior than programmes on this flat screen...

I miss those good old years sometimes. Where have those days gone ?They have really vanished before we could know it

Posting a link for 'Mile Sur Mera Tumhara.

http://www.youtube.com/watch?v=gstRrEmTcBc

Wednesday 9 May 2012

Mango Festival

रात्री ११ ते सकाळी ९ असा अंग मोडून टाकणारा मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करून गाडी जेव्हा नाटे गावातल्या गणेश रानडे यांच्या अग्रो फार्मला पोचली तेव्हा कधी एकदा उतरतो आहे असे झाले होते. पण स्वागताला उभे असलेले छोटेसे टुमदार घर, शेणाने सारवलेली स्वच्छ जमीन, सर्वदूर पसरलेली नजरेत न मावणारी हिरवाई, मोकळ आकाश आणि अवीट गोडीच्या चवीचे पाणी प्यायलो मात्र मनावरचा थकवा पळून गेला खास...आणि खरया अर्थाने सुरु झाली ती मनावरची मरगळ झटकून टाकणारी छान सहल!!!!!!!
सौजन्य अर्थात Mumbai Travellers चे . शिवनेरी ट्रेकला जुईला नेता न आल्याची रुखरुख होतीच त्यामुळे रत्नागिरीचा  हा  Mango  Festival सगळ्यांनीच बघायचा अस आधीपासूनच ठरवलं होत.... खेळीमेळीच्या  वातावरणात सगळ्यांची ओळख झाली आणि आणि गणेश रानडे यांच्या आमराईत एक छानशी चक्कर. मारली .

जवळ जवळ ३० एकरमधील ती घनदाट  आमराई  डोळ्यात मावतच नव्हती. आमराईत जाणारा तो रस्ता , भरभक्कम वाढलेले ते वृक्ष, आंब्याची कलम , वातावरणात भरून राहिलेली निरव पण प्रसन्न शांतता आणि त्या शांततेला भेदून जाणारी एखाद्या पक्षाची साद एखाद चित्रच जणू सजीव झाल्यासारखं वाटत होत..
 वाटल एखाद पुस्तक घ्याव आणि खुशाल इथल्या एखाद्या डेरेदार झाडाच्या सावलीत बसून वाचत पडाव. भरदुपारी जेव्हा उन्हाच्या झळा मारत असतील तेव्हा इथल्या झाडाला  बांधलेल्या झोपाळ्यात  बसून आराम करणं म्हणजे स्वर्गसुखच!!!!
अशा वातावरणात भूक न लागते तरच नवल . अशा वेळीस भाजणीच थालीपीठ,पोळी,माठाची भाजी,आमरस,सोलकढी,फणसाची भाजी,मिसळ पाव या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांनी तोंडाला पाणी न सुटते तरच नवल. पिझ्झा, नुडल्स ,रोटी पनीरच्या भाज्यांचे आक्रमण नाही . आंब्यासकट भाज्या,तांदूळ सार काही इथल्याच मातीत रुजलेल आणि आग्रहाने खाऊ घालणार इथल अगत्य बघून दोन घास जरा जास्तच जातात पोटात....
डोंगरावरील मचाण हि तर निव्वळ सुंदर कल्पना. ३६० अंशाचा panorama देणार हे  मचाण . त्या मचाणावरून एकाच वेळी एकीकडे सूर्यास्त आणि एकीकडे चन्द्रोदयाचा जो काही आनंद घेता आला तो निव्वळ अप्रतिम .शब्दच अपुरे पडतील. हा अनुभव घेण्यासाठी तरी एकदा इथे परत यावच..

Mumbai  Travellers च्या टीमने छान गेम्स आयोजित केले होते. खूप धमाल आली. हात मागे बांधून तोंडाने खायची mango byte , treasure hunt  , angels vs demons , अंताक्षरी, musical chair एकाहून एक सरस साऱ्यांनाच समाविष्ट करून घेतिल असे निरनिराळे खेळ... इथे TV ठेवलेला नाही पण त्याची कधी गरजच पडली नाही. टीमबरोबर केलेली मजा मस्ती आणि झालेला संवाद लाख मोलाचा.

swimming pool ,अत्याधुनिक सुविधांची रेलचेल असलेली, शहरी ऐशोआराम देणारी  अनेक मोठी हॉटेल असतात पण कोकणी भाषेची,खाण्याची आणि कोकणी मातीची गोडी जपणारे   आणि इतरांना त्याचा गोडवा तितक्याच अगत्याने देणारे,एकांत आहे पण एकटेपणा नाही असा निवांतपणा देणारे  नाटे गावाचे हे फार्म नक्कीच बघायला हवे. इथल्या हवेत डोलणारी छोटी कलम  आणि त्याच वेळीस पलीकडच्या बाजूला असलेले मोठाले आम्रवृक्ष बघितले कि  रानडे कुटुंबाचे परिश्रम,त्याची जिद्द  जाणवते. आपल्या मातीशी इमान राखून  या मातीत स्वर्ग फुलवण्याच्या त्यांच्या या प्रयोगाला  आमचा सलाम !!!!!

आणि इतकी वेगळी सहल आयोजित केल्याबद्दल , सहलीमध्ये शिस्त आणि धमाल याचा योग्य समन्वय राखत प्रवास करणाऱ्याना एक अनोखा अनुभव दिल्याबदल Mumbai Travellersche   पुन्हा एकदा आभार. लोकांना काहीतरी वेगळ देण्याची आणि त्याहीपेक्षा फेसबुकच्या परिघात राहूनहि नुसतेच नेटकरी   न होता माणसाचं एक वेगळच नेट विणण्याची या चमूची (Mumbai Travellerschi ) प्रामाणिक धडपड भावली..

परत जावेसे वाटतच नव्हते पण बरोबर कोकणाचा खाऊ आणि रम्य आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो ..